पाउस, ती आणि बावळट....!

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,

जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!

भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!

जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!

तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!

"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."

ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"

बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!

कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!

अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"

"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही... झोपेतून उठवत होती आई...!

स्वप्न आठवून हसलो जरासा
कॉलेजात जेव्हा दिसली राणी,
मैत्रिणींशी थट्टा करत
मला ती 'बावळट' म्हणुन गेली...!!!

आम्ही अशा देशात राहतो:

जिथं पोलिस आणि रुग्णवाहिकेपेक्षाही लवकर तुमच्या घरी "पिझ्झा" पोह्चतो,
जिथं वाहन कर्ज ५% तर शैक्षणिक कर्ज १२% नी मिळतं,
जिथं तांदुळ ४० रु. किलो तर "सिमकार्ड" मोफत मिळतं,
जिथं एक लखपती लाखो रुपये देवुन क्रिकेटचा संघ विकत घेतो, मात्र तीच रक्कम दान नाही करत,
जिथं पायात घालायच्या चपला/ बुटं वातानुकुलित दुकानात विकली जातात तर पोटात घालायच्या पालेभाज्या उघड्या रस्त्यावर विकल्या जातात,
जिथं प्रत्येकाला प्रसिध्दी हवी आहे, मात्र त्यासाठी कुणी सत्-मार्ग अवलंबण्यास तयार नाही,
जिथं लिंबाच्या पेयात कृत्रिम स्वाद मिळवला जातो, मात्र भांडी धुण्याचा साबणात अस्सल लिंबु असतं,
जिथं
चहाच्या टपरीवर लोक "बालमजुरी" वरच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर चर्चा
करतात - म्हणतात "यार, बाल-मजुरी करवणार्‍यांना फासावर लटकवलं पाहिजे"
.... आणि नंतर आवाज देतात...."छोटु.... दोन चहा घेऊन ये...!"

..... तरीसुध्दा ...... माझे माझ्या देशावर प्रेम आहे!

घरापासून दूर .......................

घरापासून दूर .......................
मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस

आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे