बाळुचे अफ़ेअर
एकदा ठरवल बाळुने करुया एक अफ़ेअर
बायको, समाज, सगळ्यांची सोडुन देउ केअर
अफ़ेअर वगैरे करायला बाळुला कधी मिळालच नव्हत
विरहात व्याकुळ व्हायला त्याला कधी जमलच नव्हत
आयुष्याच गाडं त्याच्या छान मार्गाला लागलं होतं
संसाराच गणित एक आणि एक तीन झालं होतं
रोज रोजच्या कटकटींना बाळुचं मन विटलं
साला रोज आपलं जेवणामधे भात आणि पिठलं
म्हणुनच ठरवल बाळुने सरळ एक अफ़ेअर करायचं
शांत एकसुरी आयुष्य थोडं ढवळुन काढायचं
लगेच शोधली बाळुने ऑफ़िसातली फ़टाकडी
शॉपींग सिनेमा भेळ,चौपाटीवर पाणीपुरी
मस्त मस्त स्वप्ने बघत बाळु झोपु लागला
कसा कोण जाणे बाळुच्या बाळीला संशय आला
एक दिवस सहज बाळु लवकर घरी आला
घरामधला सीन बघुन चक्कर येउन पडला
शेजारचा जोशा बसला होता टेचात
फ़िरवत होता हात बाळीच्या केसात
बघताच त्यांना तसे बाळुचे पित्त खवळले
पुढे जाउन जोशाचे मुस्काट त्याने फोडले
रणचंडीसारखी भेसुर हसत बाळी जोरात ओरडली
भात आणि पिठल खाउन माझीही जीभ कंटाळली
ऐकुन तिचे तसले शब्द बाळु भानावर आला
अफ़ेअर वगैरे करायचा विचार त्याने तिथेच गुंडाळला
तेव्हापासुन बाळु रोज सरळ घरी येतो
गुपचुप घरात रोज वरण भात पिठलं खातो
Subscribe to:
Posts (Atom)