ज्यांनी मराठी साम्राज्यासाठी, हिंदू संरक्षणासाठी, आणि स्वराज्यासाठी स्वताचे सर्व आयुष्य पणाला लावलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ई. स. १६३० फेब्रुवारी १९, शिवनेरी किल्ला, पुणे येथे राजमाता जिजाबाई यांच्या पोटी जन्म झाला...........
ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी 5 पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी।
ज्यांनी अख्ख आयुष्य या मातीसाठी बहाल केल, वयाच्या अगदी १६ व्या वर्षापासून ५० पर्यंत फक्त स्वराज्य आणि स्वराज्य हाच विचार केला............
२२ हजारांची फौज घेवून आलेला अफझल खान, ३२ हजार फौझ घेवून आलेला सिद्धी जोहर, ६० हजारच्या आसपास फौज घेवून उतरलेला शाहिस्तेखान, या सगळ्यात मराठी राज्य चिरडले गेले होते. या सगळ्यावर मात केली....... एक हिंदू राजा पण औरंग्याचा चाकर मिर्झा राजा १ लाख फौज घेवून उतरला, पुरंदरच्या तहात पूर्ण पराभव होता आणि आपली पुढची लढण्याची किमान शक्ती शाबूत ठेवून राजांनी हा तह पूर्णपणे मान्य देखील केला............ राजे आग्र्यामध्ये कैद असताना देखील त्यांनी कारभार चोख ठेवला....
माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ??? महाराजांकडून..............
हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला...........कडेकपारीत उगवलेलं रानफूल, पुष्पराज गुलाबाप्रमाणे सौंदर्यसंपन्न,सुगंधी नसतं,पण म्हणून ते कधी गुलाबाची बरोबरी करू शकणार नाही असं मुळीच नाही, किंबहुना ते रानफुल या गुलबापेक्षाही श्रेष्ठ असतं जेव्हा ते माझ्या राजाच्या एखाद्या गडकोटावर उगवलेलं असतं..............!!!!!!!!