मुंबईकर…….पुणेकर
मुंबई आमची कष्ट करणा-याची कर्मभूमि……
तर पुण्यात आहे जाजवल्य अभिमानाची खूमी
मुंबईकराला जास्त वेळ काही झेलवत नाही
आणि पुणेकराला मुंबईचं घड़याळ पेलवत नाही
लोकलचं टाईमटेबल आम्हाला तोंडपाठ
पुणेकर पी.एम.टी. ला घलतोय शिव्या आणि एम्.ए.टी. मारतोय लाथ
मुंबईला सकाळी ५ ला उठायची सवय काही सूटवत नाही
आणि पुणेकराला १० शिवाय काही उठवत नाही……
आधी आंघोळ नंतर चहा नाश्ता अशी आमची सवय
पुणेकराला आंघोळीच्या आधी चहा थालीपीठच हवय
आम्ही असे आम्हीच तसे…..असं सांगणं मुंबईकराला रुचत नाही
पुणेकराला मात्र ते न सांगता काहीच बोलाणं सुचत नाही…….
मन आमचं मोठं……सारं झेलतो आणि विसरून जातो
पुणेकर आपला विचारात गुरफटलेला आणखी गुरफटत राहतो…..
एकदा तरी पुणेकराने मुंबईत यावे…..एक वर्ष इथे जगुन पहावे
आळस आणि अभिमान झटकून सारा ख-या अर्थाने समृद्ध व्हावे