marathi kavita

तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी
तुला नाही आवडत मी ऊलटी घातलेली टोपी
तुला वाजते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे
आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे
मी मात्र झोपतो बाराच्या नंतर
रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग
कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
कळत नाही रंग राखाडी आहे की काळा
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता
तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा
जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा
तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण
बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

एक सांगू का तुला ?
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
तुझं आणि माझं जमेल का तसं?



कॉलेज गारवा
Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो.. जातो?????

तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
कळत नाही तुज बरोबर की मी कुठेतरी चुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
B.Sc
करून Bad जालो M.Sc करून Mad जालो,
सुखाच्या शोधात मी फक्त फक्त Sad जालो,
शिकतो तरी लोक म्हणतात मी कुठेतरी हुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
किती सहज म्हानाली होतीस की 'तुला लागणार का नोकरी..?
नोकरीच नाही तुला तर कोण देणार छोकरी..?
तुज्याविना, नोकरिविना मी मात्र सुकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
तुजा मुलगा मामा म्हणतो याच थोड वाईट वाटत,
तुज्या नवरयाच साध शेकहैण्ड मला जबरदस्त फाइट वाटत,
हसरा हसरा संसार तुजा रडता रडता बघतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
मला बक्षीश मिळाले की तूच टाळ्या वाजवायची,
सर्वांदेखत अभिनन्दन करून मला मात्र लाजवायची,
तुज्याविना कित्येक सत्कार आज गळ्यामधे टाकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
किती बोलायचो आपन बोलण्यावर बंधन नसे,
मी जालो विस्तव की तुज्या शब्दात चन्दन असे,
आता केवळ ओठवरती मी कुलुप ठोकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
बाप राब राब राबतोय मायचे हाल सांगत नाही,
उगाच तुला माज्यासाठी सहानुभूति मागत नाही,
फी साठी पार्ट टाइम जॉब करून रोज रोज थकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
माज्या गळ्यात पडलाय नुसता वचनांचा नाग,
नोटांच्या बंडलानी लागली शिक्षनाला आग,
तरीही या अग्निकुंडामधे स्वताला जोकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
नोकरी नाही, भाकरी नाही, एवढाच गुन्हा नसतो,
थोडा विश्वास ठेवायचा होता माज्या अंगातही होत रक्त,
येओ आता वादले कितीही, दिवा माजा टिकतो आहे,
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे............ !
तुला दोन मुले जाली मी अजुन शिकतो आहे.........




एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
नसेना का घडले मिलन परि…
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कधी उलगडलेच नाही!






तु मला खुप आवड्तेस

तु मला खुप आवड्तेस

अस तिच्या कानात जाउन सान्गाव

तिच्या मनात काय आहे

ते पट्कन तिच्या ओठावर याव

तुझ्या डोळ्य़ात कहीतरी आहे

अस म्हणत चट्कन नजरेत नजर मिसळावी

तुझ्या केसात काहीतरी पड्ल म्हणत

काळ्याभोर रेशमी केसाना हात लावावा

.

मच्छर बसला होता अस सान्गुन

गो

-या हातावर एक चापट मारावी .

मग तिने राग आल्यासा्रख करुन

चापटीने त्वचेवरची लाली दाखवावी

कधी नकळ्त तिचा हात हातात घ्यावा

आणी तिचा नाजुक उबाबदार स्पर्श व्हावा

जाणीव होताच तिने हात खेचुन घ्यावा

वाट्त असा शण दिवसातुन एकदातरी यावा

समोर उभी असताना नजर सळसळत असते

तिला वाट्ते माझी नजर तिलाच बघत असते

मग काहीतरी फ़ेकुन मारण्याची धमकी देत असते

तर कधी मी निघुन जाईन अशी भिती दखवत असते

No comments:

Post a Comment