काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!

नटून थटून आली जेव्हा ती बेस्ट बसमधून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

पाहताच तिला मी एकदम क्लीन बोल्ड झालो…
एप्रिल च्या कडकडीत दुपारी आय ऍम सो कोल्ड झालो!
भूक हरवली, झोप उडाली झालो दिवाना तिज पाहून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

व्हॅलेंटाइन्सला ठरवलं, तिला सांगू मनातली गोष्ट…
पण दुर्भाग्य माझं असं की तिचे भाऊ होते फार धष्टपुष्ट!
गोष्ट राहिली बाजूलाच, आणि आलो मी हनुमान होऊन…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

मी ही हार मानणारा नव्हतो म्हटलं शोधू नवा मार्ग…
तडक जाऊन मग शोधून काढला मी एफवायबीकॉम चा वर्ग!
जे काही पाहिले ते पाहतंच राहिलो डोळे विस्फारून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

विश्वास बसता बसेना की ती वर्गासमोर उभी होती…
एफवाय च्या वर्गाला ती ‘सी प्रोग्रॅमिंग’ शिकवत होती!
जिच्यावर लाईन मारत होतो आलो तिलाच मॅडम म्हणून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!

एक चूक

तो तिच्यासाठी खूप खूप झुरायचा
ती जायील तिकडे तो फिरायचा
तीच घर ते कॉलेज आणि कॉलेज ते
तीच घर हेच त्याच्या क्लास होता
दिवसभराचा पूर्ण वेळ तिच्याबरोबर
घालवायचा हे त्याचं स्वप्न होत
न राहूनही त्याने तिला विचरायचे ठरवले
त्या दिवसापासून त्याचे मनच हरवलं
एक दिवशी त्याने तिला विचारलं
देशील का जीवनभर हात
ती त्याला म्हणाली एड्स ने केलाय रे
माझा घात. रे केलाय माझा घात.
असं महनून ती तिथून रडत निघून गली
जाता जाता एक मोठं वादळ निर्माण करून गली
दुसऱ्या दिवशी भेटली तेव्हा तो तिला म्हणाला
अग मी तर रोज पाठलाग करतो पण
तू तर कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेज
मग हे कसं काय ?
ती म्हणाली माझ्या वडिलांची एक चूक
मला खूप महागात पडली.
रक्त न चेक करता भालेरयाची सजा मला घडली
मी असताना शाळेत घडला होता माझा अपघात
तोच करून गेला माझ्या पूर्ण जीवनाशी घात
हे ऐकूनही तो तिला म्हणाला
देशील का जीवनभर साथ
तुला इतकं सुखी ठेंवन कि तुला
आठवणार सुद्धा नाही कि कधी काळी
केला होता एड्स ने केला होता तुझा घात
केला होता तुझा घात .


उत्कर्ष शिंदे

एका अव्यक्त प्रेमाची गोष्ट

एका मुलाला कॅन्सर होता. अवघ्या महिन्याचाच तो सोबती होता. तो रोज एका सीडीच्या दुकानावर जायचा. या दुकानात एक छानशी मुलगी होती. ती त्याला फार आवडायची. मनोमन तो तिच्यावर प्रेम करायचा. सीडी आणायला गेला की तिच्याशी गप्पा मारता मारता वेळ कधी संपायचा ते त्याला कळायचंही नाही. तिच्याशी बोलायला मिळतंय म्हणून तो अगदी रोज... त्या दुदुकानावर जायचा. पण आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती तो कधीही करू शकला नाही. त्याचं तेवढं धाडसंच झालं नाही.

एका महिन्यानंतर दुखणं बळावलं आणि त्याचा मृत्यू झाला. तिच्यावरचं त्याचं प्रेम त्याच्या मनातच राहून गेलं.

बर्‍याच दिवस तो येत का नाही म्हणून सीडीच्या दुकानातली मुलगी एकदा त्याचा पत्ता शोधत घरी पोहोचली. घरी त्याची आई होती. आईला तिने त्याच्याविषयी विचारलं. त्या माऊलीच्या ओघळत्या आसवांनीच तिला सारं काही सांगितलं. त्याची आई तिला त्याच्या खोलीत घेऊन गेली.

त्या खोलीत गेल्यानंतर तिनं पाहिलं. सगळ्या सीडी जशा नेल्या तशाच ठेवल्या होत्या. न उघडता.

आता मात्र तिला रडू आवरेना. कारण माहितेय?

कारण तिनं त्याला लिहिलेली सगळी प्रेमपत्र त्या सीडीच्या पाकिटात तशीच राहून गेली. त्यानं न वाचता. तीही त्याच्यावर तितकंच उत्कट प्रेम करत होती. पण.....

म्हणून कुणावर प्रेम करत असाल तर त्या प्रेमाला वेळीच अभिव्यक्त करा. याबाबतीत कुसुमाग्रजांनी सांगितलेलं एवढं नक्कीच लक्षात ठेवा.

शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,
बुरुजावरती झेंडयासारखा फडकू नकोस.

उधळून दे तूफान सगळं,
काळजामध्ये साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं,
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा,
मेघापर्यंत पोहचलेलं.
(कुठेतरी छानसे वाचलेले)

प्रेमात हरलेला मुलगा .......

प्रेमात हरलेला मुलगा .......
जेव्हा मुलाचा प्रेम भंग होतो आणि मग त्याला आठवते ती आई...
बघा मग पटत का तुम्हाला...
प्रेमात हरलेला मुलगा .......त्याच्या आईस … काय म्हणतो ??/

आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का?
आई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,
माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?

ठाउक आहे मला,
आई तू बोलायचिस,
बाळा तू फसत आहेस,
आतल्या आत का धसत आहेस?

ठाउक आहे मला,
मी तुझ्या बोलन्या कड़े काना डोळा करायचो,
तिच्या प्रेमात अजुनच बूडत जायचो,
परतीचे सर्व मार्ग स्वतःच बंद करत जायचो...

आई,तरी आज तू मला समजुन घे,
माझ्या केसात हात तुझा फिरवत,
माझा चेहरा वाचून घे,
डोळ्या कड़े मात्र बघू नकोस,
आसवान आड़ तिला डोळ्यातच राहून दे...

आई,तू प्रश्नांची घाई करू नकोस,
मी हळू-हळू माझे मन मोकळे करेन तुझ्या कड़े,
आहे जे काही साठलेले मनात सर्व वाहीन तुझ्यापुढे,
मी सर्व सांगत असताना मात्र तू धीर सोडू नकोस...

मी तिच्या बद्दल जे काही सांगेन
ते तू खुल्या मनाने ऐक,
तुला वाटेल मी तिची बाजू मांडत आहे,
पण तू माझी बाजू बघून अश्रु ढाळू नकोस,

आई मी कदाचित माझा धीर सोडेन,
रडून-रडून तुझे पदर ओले करेन,
तरी तू तिच्यावर रागावू नकोस,
आता पुरे म्हणून मला रडायचे थाम्बवु नकोस,

तुझे ऐकत नाही म्हणून कदाचित तू मला तुझ्या पासून दूर लोटशील,
तू किव्हा मी ठरव असे देखिल म्हणशील,
पण आई असे विचारून तू तुझ्या लेकराची परीक्षा घेऊ नकोस,
विसरत नाही तिला म्हणून मला कायमचे दूर करू नकोस...

माहीत आहे तिने तुझ्या लेकराचे मन तोडले,
तुझ्या लेकराचे स्वप्न पूर्ण होण्या आधीच मोडले,
आई...तरी ज़रा सबुरिने घे,
मला तेव्हा हवे असलेला तुझा आधार दे...

तेव्हा सावरल्यावर मी कदाचित परत मी तिच्या कड़े जाइन ,
थोड्या दिवसाने परत माझे तुटलेले मन घेउन तुझ्या कड़े येइन,
तेव्हाही मी तुला हाच प्रश्न करेन,
आई आज मला तुझ्या कुशीत डोके ठेऊन देशील का?
आई आज तुझ्या डोळ्यात असलेले ,
माझ्या प्रेमा बद्दलचे भाव दूर करशील का?
(कुठेतरी छानसे वाचलेले)

का ? तू असे का करतेस ?

माझ्याकडे बघून दुसरयासंगे बोलतेस,
तुझ्याकडे बघितल्यावर मैत्रिणीकडे बघतेस,
का ? तू असे का करतेस ?
क्लास मध्ये बसल्यावर माझ्याकडे बघतेस,
मी बघितल्यावर थेट फुडेच बघतेस,
का ? तू असे का करतेस ?
सर क्लास घेताना माझ्याकडे बघतेस,
मी बघितल्यावर सरानाचाकडे बघतेस,
का ? तू असे का करतेस ?
मला एक कळत नाही तू नकी भीतेस कुणाला मला , मुलांना कि सरांना ?
इतकी भीतेस तर प्रेम करतेसच कशाला,
जा ना चाळणीत पाणी घेऊन जीव दे जगतेस कशाला ?


उत्कर्ष शिंदे