लग्न का करावे?

हेमंत आठल्ये द्वारे काल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये लिहिलं होत ‘खूप अर्जंट आहे मला फोन कर’. काही तरी खूपच महत्वाच काम आहे बहुतेक म्हणून मी तीच्या लहान बहिणीला फोन केला. तर ती म्हणाली की मला नवीन नोकरी लागली आहे. आणि मला संगणकाच्या प्रक्टिससाठी तुझा संगणक हवा आहे. तिला मी म्हणालो की मला आज गावी जायचं आहे. कंपनीतून मी डायरेक्ट निघेन. आणि मंगळवारी येईल. ती म्हणाली पण मला खूप आवश्यक आहे. तू काही तरी मार्ग काढ ना. तीला म्हटलं ठीक आहे. मी संध्याकाळी तुला संगणक देतो. बर म्हणून तिने फोन ठेवला.


क्लायंट च्या म्हणण्यानुसार मी काम करत असताना काही कामानिमित्त मला माझ्या सहकारणीचा संगणक सुरु करावा लागला. तिचा संगणक सुरु केल्या केल्या तिचे जीटौकचे ऑटोमेटिक साईन इन झाले. बहुतेक तसं तीन सेट करून ठेवले असावे. बर मी ते जीटौक बंद करणार तेवढ्यात तीच्या मित्राचा ‘हाय’ चा मेसेज आला. मी तीचे जीटौक बंद केले. घरी येताना बस पकडली. येताना बरेच दुचाकीवाले त्याच्या गर्लफ्रेंडला मागे बसवून फिरायला चाललेले. आता तीच्या बसण्याच्या पद्धतीवरून मी ती त्या दुचाकीवाल्याची गर्लफ्रेंड आहे अस म्हटलं आहे. खर तर हे पुण्यात काही नवीन नाही. आणि मी कधीही न पहिली अशीही गोष्ट नाही. पण तरी देखील अशा गोष्टी नेहमी बघायला मिळतात. खर तर येताना मी विचार करत होतो की माझ्या सहकाराणीचा पीसी सुरु आणि तीच्या मित्राचा ‘हाय’, ही काही नवीन गोष्ट नाही. परवा तिचा आणखीन एक मित्र तिला आपण रविवारी दुपारी तीन वाजता भेटायचे का म्हणून चाट वर विचारात होता. बर तो काही तिचा ‘बॉयफ्रेंड ‘ वगैरे नाही. खर तर तिचा बॉयफ्रेंड मुंबईचा पण हिला पुण्यात फिरवणारे काही कमी नाही. तसं म्हणायचं झाल तर त्यांनी हिला फिरावाण्यापेक्षा हीच त्यांना फिरवते अशी शंका येते.



आमच्या शेजारी तर काही विचारू नका. दोघा नवरा बायकोची खूप भांडण होतात. पण जय शेजारच्या बायकोचाच होतो. मी अनेक जण बघितली आहेत. पण लग्न करून सुखी अस कोणीच नाही. माझा बॉस नेहमी कंपनीतून निघताना त्याच्या बायकोचा फोन येतो. की ताबडतोप या म्हणून. आज सुद्धा क्लायंट मध्ये एक लेडीज होती. ती काही म्हणाली की तिचा कलीग ताबडतोप ‘राईट’ म्हणायचा. माझा एक मित्र आहे त्याचे लग्न होऊन साधारणत एक वर्ष झाल असेल त्याला एकदा मी विचारलं होत की ‘कस वाटत लग्न आधी आणि आता?’ त्यावेळी तो म्हणाला होता ‘आपल्याला वाटत की खूप मजा असते म्हणून पण खर तर खूप जबाबदारी असते. एका जीवाचा सांभाळ आणि संरक्षण’. त्याच्याशी चर्चा केल्यावर तो पहिल्यापेक्षा अधिक चिंतेत वाटला होता. माझ्या काका काकूला बघून, मित्र आणि त्याच्या बायकोला बघून, मावशी आणि तिचे मिस्टर बघून, माझ्या बॉस ला बघून अस वाटल नाही की लग्न करून कोणी सुखी झाल आहे. उलट अनेक बंधन आली अस वाटल. बॉसला कंपनीतून निघताना बायकोला मी कंपनीतून निघून घरी येतो आहे अस सांगावं लागत. सहकार्णीच काही विचारू नका. तिचा बॉयफ्रेंड तिला फोन करतो. पण मी अस कधी बघितलं नाही की ने स्वताच्या मोबाईल वरून त्याला फोन केला. जाऊ द्या हा विषय वेगळा आहे. तात्पर्य फ़क़्त एकाच लग्न करून मला तरी काही आपण सुखी आनंदी राहू अस वाटत नाही.



म्हणजे विकेंड असला की तीच्या इच्छे खातर कधी मॉल मध्ये जाऊन हजार- दोन हजाराचा चुराडा करायचा. बर ती घेणार काय तर चप्पल किंवा ड्रेस. आणि तो देखील फार फार तर सहा महिने वापरणार. तिथून मग तिची इच्छा हॉटेलमध्ये जेवण करण्याची. झाल ते होऊन देखील कधी हे पाहिजे तर कधी ते पाहिजे. म्हणजे आपण कशासाठी जगतो हेच कळत नाही. कंपनीतील नोकरी झाली की बायकोची चाकरी. आता मला याचा काही अनुभव नाही पण मी ज्या ज्या जणांचे लग्न झालेले आहे त्यांना बघून तरी लग्न म्हणजे न संपणाऱ्या बायकोच्या इच्छा. मग मुले. त्यांची शाळेची, त्यांच्या अभ्यासाची काळजी आपण करायची. अस सगळ गडबड गोंधळ बघितला की वाटते लग्न का करावे?

No comments:

Post a Comment